kaaljaat ghar karun raahanaari Dushyant Kumar Yanchi Gazal-by Adv.Amol Waghmare
काळजात घर करून राहणारी दुष्यंत कुमार यांची गझल
-by Adv.Amol Waghmare
दुष्यंत कुमार हे नाव जगभरातील हिंदी,उर्दू आणि मराठीसह अनेक भाषांमधील
गझल रसिकांमध्ये सर्वपरिचित आहे. हिंदी गझलविश्वात वेगळे स्थान निर्माण करून वाचकांच्या काळजात घर करून राहणारी गझल, अशी दुष्यंत कुमार यांच्या गझलेची ओळख आहे. हिंदी गझलेला नवे आयाम देवून त्यांनी समृद्ध केले आहे. दुष्यंत कुमार यांच्या गझल साहित्याविषयी विपुल लेखन झाले आहे. बदलत्या कालाच्या परिप्रेक्ष्यामध्ये देखील या गझलांची समयोचित अर्थपूर्णता व श्रेष्ठत्व अबाधित आहे. समकालीन मुल्य असल्यामुळे आजही ही गझल तितकीच प्रभावी आहे. त्यामुळेच दुष्यंत कुमार यांची गझल आजही रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे.
ये जुबाँ हमसे सी नहीं जाती
जिंदगी है कि जी नहीं जाती
इन सफ़िलोमे वो दरारे है
जिसमे बसकर नमी नहीं जाती
एक आदत सी बन गई है तू
और आदत कभी नहीं जाती
मुझको ईसा बना दिया तुमने
अब शिकायत भी की नहीं जाती
('साये मी धूप', पृ. ४५)
अतिशय साध्या शब्दांत विविध विषयांवर नेमकेपणाने भाष्य करण्याची हातोटी
कवीला लाभली होती. हिंदीमध्ये प्रचलित गझल परंपरेपेक्षा वेगळी आणि
गझल आकृतीबंधाचे सर्व निकष सांभाळून स्वत:चे स्वतंत्र अस्तित्व जपणारी,
स्वतंत्र लेखनशैली असलेली ही गझल
सिर्फ हंगामा खडा करना मेरा मक्सद नहीं
मेरी कोशिश है की सूरत बदलनी चाहिए
या दुष्यंत कुमार यांच्या उक्तीस लेखनाच्या बाबतीत सार्थ ठरवते. दुष्यंत यांची
गझल बहुचर्चित आणि लोकप्रिय आहे. अनेक समीक्षकांनी या गझलेचे विविध अंगांनी
विश्लेषण केले आहे. उच्च निर्मितीमूल्य असलेल्या या गझलेवर भाष्य करतानाच
समीक्षकांनी तिचे श्रेष्ठत्व वेळोवेळी प्रमाणित केले आहे.
कहाँ तो तय था चिरागाँ हरेक घर के लिए
कहाँ चिराग मयस्सर नहीं शहर के लिए
यहाँ दरख्तों के साए में धूप लगती है
चलो यहाँ से चले उम्रभर के लिए
न हो कमीज तो पाँवोसे पेट ढक लेंगे
ये लोग कितने मुनासिब है, इस सफ़र के लिए
वे मुतमइन है कि पत्थर पिघल नहीं सकता
मै बेकरार हूँ आवाज़ में असर के लिए
('साये मी धूप', पृ. १३ )
गझल लिहिताना गझलकाराला विचारांचा समुद्र कमंडलू मध्ये धारण करणारा अगस्ती
व्हावे लागते, तेव्हा कुठे गझल सशक्त बनते. म्हणजेच शेर लिहित असताना एखादा
विषय अथवा विचार त्याच्या संपूर्ण व्याप्तीसह मोजक्या शब्दात मांडावा लागतो
आणि हे करताना गझलेच्या तंत्राची चौकात सांभाळून अभिव्यक्तीतील प्रभावीपणा
कुठेही कमी होणार नाही याची काळजी देखील घ्यावी लागते. गझलेच्या पहिल्या
ओळीत एखाद्या विषयाची कौशल्यपूर्वक मांडणी केलेली असते आणि दुसऱ्या
ओळीत या विषयाचा कौशल्याने समारोप केलेला असतो. विषय वैविध्य ही सशक्त
गझल निर्मितीची अपरिहार्यता असते.
खँडहर बचे हुए है इमारत नहीं रही
अच्छा हुआ कि सर पर कोई छत नहीं रहीं
तमाम उम्र हमने अकेले सफ़र किया
हमपर किसी खुदा की इनायत नही रही
कुछ दोस्तोंसे वैसे मरासिम नहीं रहे
कुछ दुश्मनोंसे वैसी अदावत नहीं रही
साइन में जिंदगी के अलामत है अभी
गो जिंदगी की कोई जरुरत नहीं रही
('साये मी धूप', पृ. १८)
दुष्यंत कुमार यांची गझल वाचकांच्या मन:पटलांवर संवेदनांचे जे तरंग उमटवते,
ते वाचकांना विचार करायला भाग पाडतात. कवीच्या शब्दातून व्यक्त होणाऱ्या
संवेदना जेव्हा वाचकांच्या मनातील संवेदनांशी नाते सांगू लागतात आणि वाचकही
जेव्हा कवीच्या शब्दांमधील संवेदनांमध्ये स्वत:च्या संवेदना शोधू लागतात;
फक्त तेव्हाच कोणत्याही रचनेच्या निर्मितीस पूर्णत्व येते,असे म्हटले पाहिजे.
दुष्यंत कुमार यांची गझल बहुआयामी आहे. ती साचेबद्ध नाही. एक निरागसता
आणि प्रवाहीपणा या गझलेने जोपासला आहे.
इस रास्ते के नाम लिखो एक शाम और
या इसमे रोशनी का करो इंतजाम और
आँधी में सिर्फ हम ही उखड़कर नहीं गिरे
हमसे जुदा हुआ था कोई एक नाम और
मरघट पे भीड़ है या मजारों पे भीड़ है
अब गुल खिला रहा है तुम्हारा निजाम और
हैरां थे अपने अक्स पे घर के तमाम लोग
शीशा चटख गया तो हुआ एक काम और
सामाजिक विषयांवर देखील कवीने अनेक ठिकाणी मार्मिक भाष्य केले आहे. त्यामुळे सामाजिक वास्तवाबाबत अत्यंत जागरूक भान असलेली ही गझल असल्याचे वाचकाना
सहजपणे जाणवते. समाजातील विरोधाभासांवर कवीने काही अशआर ('शेर' चे अनेकवचन) मधून
प्रखरपणे प्रहार केल्याचे जाणवते. यासाठी उपरोधिक आणि उपहासगर्भ शैलीत भाष्य
करण्यात प्रभावी भाष्य करण्यात कवी यशस्वी ठरला आहे. दुष्यंत कुमार यांनी गैर-मुसलसील गझल जास्त प्रमाणात लिहिली आहे. गैर-मुसलसील गझले मध्ये वेगवेगळ्या विषयांवरील
शेर एकाच गझलेत समाविष्ट केलेले असतात. गैर-मुसलसीलीयत हे गझलेचे खास वैशिष्ट्य समजले जाते.
अब किसीको भी नजर नहीं आती कोई दरार
घर की हर दिवार पर चिपके है इतने इश्तेहार
हालते इन्सान पर बरहम न हो अहले वतन
वो कहींसे जिंदगी भी मांग लायेंगे उधार
रोज अखबारों में पढ़कर ये ख़याल आया हमें
इस तरफ आती तो हम भी देखते फ़स्ले बहार
जवळपास फक्त ५३ गझल रचना करूनही हिंदी गझलेचा शिखर्बिंदू असल्याची
सर्वमान्यता मिळाल्याने दुष्यंत कुमार यांच्या काव्यप्रतिभेचे श्रेष्ठत्व सिद्ध झाले आहे.
-by Adv.Amol Waghmare
amolwaghmare001@gmail.com
mob-9404485850
8421561384
पुर्व प्रकाशन :"साक्षात" (एप्रिल-मे-जून ) - २०१२