Monday, September 9, 2024

परवीन शाकीर यांची गझल - adv. अमोल वाघमारे

परवीन शाकीर यांची गझल

पाकिस्तान सारख्या मुलतत्ववाद्यांचा प्रचंड प्रभाव असलेल्या आणि स्त्री स्वातंत्र्य तसेच अभिव्यक्तीला मोठा विरोध असलेल्या देशात अतिशय खुलेपणाने लेखन करून उर्दू साहित्यामध्ये मोलाचे आणि भरीव योगदान देणारी सशक्त कवयित्री म्हणून परवीन शाकीर यांचे नाव घ्यावे लागेल. प्रेम व प्रेमाची संबंधित अनेक विषय जसे प्रेमाचा  इजहार, आकर्षण, उत्कटता, अस्वस्थता, ओढ, स्वप्ने, आतुरता, आनंद, शृंगार, दुःख, विरह  आणि त्याही पुढे जाऊन या विरहातून आलेले विखुरलेपण, आत्मचिंतन हे कवयित्रीचे लेखन विषय आहेत . 

 अक्से - खुशबू हूँ , बिखरनेसे न रोके कोई 

 और बिखर जाऊ मुझको न समेटे कोई  

कांप उठती हूँ मै ये सोचके तनहाई में 

मेरे चेहरे पे तेरा नाम न पढले कोई

जिस तरह ख्वाब मेरे हो गए रेजा रेजा

इस तरहसे टूट के न बिखरे कोई 

परविन शाकीर यांचा जन्म 24 नोव्हेंबर 1952 रोजी पाकिस्तानातील कराची या शहरात झाली. सुरुवातीचे शिक्षण घराची मध्येच पूर्ण केल्यानंतर त्यांनी इंग्रजी साहित्यामध्ये  एम. ए . केले.  त्यानंतर इंग्रजी भाषा या विषयात एम.ए. पूर्ण करून बँकिंग एडमिनिस्ट्रेशन या विषयात देखील पदवीधर शिक्षण घेतले ; तसेच पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन या विषयात पदवीधर शिक्षण घेतले आणि इंग्रजी साहित्यात पी एचडी देखील पूर्ण केली . सुरुवातीच्या काळात अध्यापनाचे कार्य करणाऱ्या परवीन शाकीर यांनी नंतर कस्टम विभागाच्या अधिकारी पदावर काम केले . 

प्रवीण शाखेर यांच्या गजरेमध्ये स्त्री जाणिवांना अतिशय नजाकतीने शब्दबद्ध केल्याचे दिसून येते. या कवयित्रीच्या अभिव्यक्तीमध्ये हळुवारपणा शब्दांमधील संस्था आणि अर्था मधील गहिरेपणा यामुळे एक जिवंत काव्य शिल्प उभे राहते.

फिर मेरे शहर से गुजरा वो बादल की तरह

दस्ते - गुल फैला हुआ है मेरे आँचल की तरह 

पास जब तक है वो रहे दर्द थमा रहता है 

फैल जाता है फिर आँख के काजल  की तरह 

कह रहा है किसी मौसम की कहानी अब तक 

जिस्म बरसात में भीगे हुए जंगल की तरह 


आधुनिक उर्दू साहित्यिकांमध्ये हिंदी भाषेकडे कल वाढत चालल्याचे दिसून येते. याचे एक कारण म्हणजे भाषेमध्ये सोपे पणा आणून काव्य सामान्य लोकांसाठी आकलन सुलभ व्हावे, यासाठी अरबी -फार्सी प्रचुर शब्दांचा वापर मर्यादित स्वरूपात करण्याचा आणि जनसामान्यांमध्ये आपल्या काव्याची स्वीकारार्हता वाढावी, असा प्रयत्न  करणारा एक मोठा वर्ग लिहिता झाला आहे. साध्या सोप्या शब्दात देखील प्रभावी काव्यरचना करता येऊ शकते, हे परवीन शाकीर यांनी दाखवून दिले आहे . शैली श्रेणी आणि क्षमता या तिन्ही बाबींमध्ये स्वतःचे श्रेष्ठत्व सिध्द करणारे काव्य कवयित्रीच्या लेखणीतून उतरले आहे. 

बैठी है बाल खोले हुए मेरे पास शब 

आई है कौन शहर से इतनी उदास शब 

मै चुप रही तो रात ने भी होंठ सी लिए 

मै उसका पैरहन हूँ तो मेरा लिबास शब 

सूरज को देखने का सलीका कहा हमे

जब भी नजर उठाई रही आसपास शब 

प्रेमातील स्त्री - जाणिवेला शब्द देणाऱ्या  सौंदर्योपासक दृष्टीच्या या कवयित्रीवर कबीर आणि मीरा यांच्या काव्याचा मोठा प्रभाव आहे. सुरुवातीच्या काळात परवीन शाकीर यांनी 'बीना' हा तखल्लूस घेऊन काव्यलेखन केले. त्यांनी लिहिलेल्या नज्म देखील त्यांच्या गझले इतकेच लोकप्रिय ठरल्या. अगदी तरुण वयापासूनच त्यांनी लेखनाला सुरुवात केली. गद्य लेखन , पत्र लेखन , उर्दू तसेच इंग्रजी वृत्तपत्रांमधून  स्तंभ लेखन या सारख्या विविध माध्यमातून त्यांनी आपली प्रतिभा सिद्ध केली. त्यांची अनेक पुस्तके वाचकांच्या पसंतीस उतरली आणि जागतिक पातळीवर लोकप्रिय ठरली. यामध्ये खुशबू (1976), सॅड  बर्ग (1980), खुद कलाम ( 1990) , इनकार ( 1990 ), माह -ए -तमाम (1994) आणि कफ - ए - आईना इत्यादी कविता संग्रह तर गोषा - ए - चष्म या गद्य लेखनाचा समावेश असलेल्या पुस्तकांचा प्रामुख्याने उल्लेख करावा लागेल. वरील कवितासंग्रहांमधील नज्म आणि गझलांना समीक्षकांच्या प्रशंसेची  देखील पावती लाभलेली आहे. 

तेरी खुशबू का पता करती है 

मुझपे एहसान हवा करती है 

अब्र बरसे तो इनायत उसकी  

शाख तो सिर्फ दुवा करती है  

शब की तन्हाई मे अब तो अक्सर 

गुफ्तगू तुझसे रहा करती है 

उसने देखा ही नही वरना ये आँखे 

दिल का अहवाल कहा करती है  

परविन शाकीर यांच्या गझल लेखनाचा स्त्री हा स्वाभाविक विषय आणि केंद्रबिंदू आहे.  मात्र फक्त स्त्री संबंधित विषय कवयित्रीच्या लेखनाची मर्यादा नाही, हे या ठिकाणी प्रकर्षाने नमूद करावे लागेल. कुठलीही एक मर्यादा अथवा चाकोरी न स्वीकारणारी गझल परवीन शाकीर यांच्या लेखणीतून उतरली आहे. त्यांच्या गझले मधील सहजता आणि तरलता ही लक्षवेधी आहे.  परवीन शाकीर हे उर्दू साहित्यातील एक मोठे नाव आहे. अनेक ज्येष्ठ आणि श्रेष्ठ गायकांनी त्यांच्या गझला गायल्या असून भारतासह जगभरात त्या लोकप्रिय ठरल्या आहेत. बहुआयामी व प्रगल्भ लेखन करणाऱ्या या कवयित्रीने दर्जेदार साहित्य निर्मिती करून उर्दू साहित्याला एका नव्या उंचीवर नेऊन ठेवले आहे. भारतात देखील परवीन शाकीर यांची काही पुस्तके प्रकाशित झाली आहेत. यामध्ये अब्दुल बिस्मिल्लाह यांनी संपादित केलेल्या 'परवीन शाकिर - प्रतिनिधी कविताएं ' या गझल प्रधान काव्यसंग्रहाचा प्रामुख्याने उल्लेख करावा लागेल. अनेक पाकिस्तानी साहित्यिकांना भारतीय संस्कृती व संकल्पनांचे मोठ्या आकर्षण आहे.ते त्यांच्या साहित्यातून वेळोवेळी व्यक्त झालेले आहे. परवीन शाकीर देखील याला नाहीत. अब्दुल बिस्मिल्लाह यांच्या मते " पाकिस्तान की आधुनिक उर्दू शायरी में हिंदी लबो लहजा की तरफ एक खास किस्म का झुकाव दिखाई पड़ता है।  परवीन शाकीर की कविताओंमे भी स्पष्ट है। 'गोरी करत सिंगार', 'पूरबी', 'श्याम! मै तेरी गैयां चराऊं' और 'ऐ जग के रंगरेज' जैसी नज्मो को पढते हुए संत कवीयों के 'निर्गुन' और मिराबाई के भावोव्देलक पदों का स्मरण अनायास ही हो जाता है ।" 

    उर्दू शायरीला नवे आयाम देणऱ्या अशा या कवयित्रीचा मृत्यू 26 डिसेंबर 1994 रोजी इस्लामाबाद येथे कार अपघातामध्ये झाला. मृत्यू समयी त्यांचे वय अवघे 42 वर्षे होते. परवीन शाकीर यांची गझल साहित्य  रसिकांच्या नित्य स्मरणात राहील.